…अखेर मराठा विधवा महिला सुवर्णा बाबासाहेब कदम यांना घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला..

सिंधुदुर्ग: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ संजना संदेश सावंत , माजी अध्यक्ष संदेश सावंत, सभापती, उपमुख्यकार्यकारी श्रीमती दिपाली पाटील यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दिलेल्या आश्वासनानुसार विधवा महिला सुवर्णा बाबासाहेब कदम यांना न्याय मिळवून दिला त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा सिंधुदुर्ग च्यावतीने आयु. रावजी गंगाराम यादव यांनी आभार मानले.
याप्रकरणाचा इतिहास असा आहे की,
मौजे कुर्ली गावच्या रहिवाशी श्रीम. सुवर्णा बाबासाहेब कदम यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्या प्रमाणे आज वरील मान्यवरांच्या समवेत बैठक झाली.
१) मुळ घरमालक घर क्रमांक 98, कै. बळवंत देऊ कदम हे तक्रारदार यांचे आजे सासरे होय.
या कै. बळवंत कदम यांना दोन मुलगे (१) राजाराम (२) दत्ताराम
कै. बळवंत मयत झाल्यानंतर त्यांचे घर उता-यावर या दोन्ही मुलांची नावे नोंद करणे आवश्यक होते, परंतु तत्कालीन ग्रामसेवक यांनी घर नंबर 98 बदलून नवीन घर नंबर 138 देऊन ते घर 2003 पर्यंत दत्ताराम बळवंत कदम यांचे नावे केले, असताना परत हाच घर नंबर म्हणजेच 138 रद्द करून 240 घर नंबर दिला.
श्री. दत्ताराम ला ६ मुलगे अनुक्रमे दीपक, सूर्यकांत, आबासाहेब, चंद्रकांत, शाहूकांत, शशिकांत नावे नोंदविताना नंबर 240 रद्द करून 207 हा नवीन नंबर ग्रामसेवक यांनी दिला, यांची सखोल चौकशीची मागणी केली होती.
परंतु महत्त्वाची बाब म्हणजे कै. बळवंत मयत झाल्यानंतर दत्ताराम आणि राजाराम अशी दोन नावं घर उता-या वरती न नोंदविता फक्त श्री. दत्ताराम चे नाव नोंदविले, आपोआपच दुसरा मुलगा राजाराम हा बेघर झाला.
राजारामला दोन मुलगे एक प्रकाश आणि दुसरे बाबासाहेब हे दोघेही या घरात राहत होते, पण घर उता-यावर यांची नाव नाहीत, ग्रामपंचायती ची कोणतीही परवानगी न घेता दुरुस्ती च्या नावाखाली सुवर्णा बाबासाहेब कदम हिला घरातून बाहेर काढून त्या आज पावसाळ्यात कसे राहतात हे छायाचित्राद्वारे दाखवून दिले तेव्हापासून ते बेघर आहेत,
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच ग्रामसेवक यांनी एकाच तारखेला म्हणजेच 15.1.2020 ला घर नंबर 240 श्री. दत्ताराम बळवंत कदम, घर दगड-मातीचे कौलारू,
दुसरा घर नंबर 138 श्री. दत्ताराम बळवंत कदम, कच्चे कौलारू घर,
घर नंबर 207 घर मालक म्हणून श्री दत्ताराम चे मुलगे अनु. सूर्यकांत, दीपक, आबासाहेब, चंद्रकांत, शाहूकांत, शशिकांत, अशी नावे घर उता-यावरती नोंदविताना ग्रामसेवक यांनी कोणत्या कागदपत्रांची छाननी केली हे अनाकलनीय आहे.
दिनांक 27.11. 2013 ला घर नंबर 207 श्री. दत्ताराम चा मुलगा सूर्यकांत फक्त एकाचेच नावे पक्के घर, पाया दगडी भिंत, चिरे, छप्पर कौलारू हे कसे काय नोंदविण्यात आले याची चौकशीची मागणी केली होती.
तक्रारदार श्रीम. सुवर्णा बाबासाहेब कदम ही बळवंत कदम यांचे दुसरे मुलगे राजाराम हे मयत असून त्यांना दोन मुलगे एक प्रकाश आणि दुसरा बाबासाहेब या बाबासाहेब यांच्या हिंदू धर्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे सुवर्णा ही बाबासाहेब यांची धर्मपत्नी आहे.
यांना आज पावसाळ्याचे दिवस असूनही घराबाहेर काढून आज ही आपल्या मुलांना घेऊन पत्राशेड मध्ये आहेत हे छायाचित्रातून दाखवले
आमची मागणी होती
(१) मूळ घर क्रमांक 98 मध्ये कै.बळवंत यांना दोन मुलगे दत्ताराम आणि राजाराम यांच्या नावाची नोंद करणे किंवा
त्यांच्या वारसा प्रमाणे घर उतारा मध्ये नावाची नोंदणी होणे
(२) सुवर्णा या विधवा महिलेला घरामध्ये घेऊन तिच्या नावे घर उता-यात नोंद करून तसा घर उतारा देण्यात यावा,
(३) या उपोषणामुळे कुणाची मन दुखावली असा गैरसमज करून घेऊन यापुढे या विधवा महिलेला यांच्यापासून कोणताही धोका निर्माण झाल्यास मला प्राप्त झालेल्या कागदपत्रांवरून प्रथमदर्शनी त्याला सर्वस्वी जबाबदार संबंधित ग्रामसेवक, संबंधित मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती वैभववाडी, मा.पोलीस निरीक्षक वैभववाडी, मा सरपंच ग्रामपंचायत कुर्ली हे जबाबदार राहतील. कारण याप्रकरणी श्रीम. सुवर्णा बाबासाहेब कदम यांनी पत्रव्यवहार करून तिच्या अक्कल हुशारी चा फायदा घेऊन तिला नैसर्गिक न्यायापासून वंचित ठेवले आहे. म्हणून
जोपर्यंत या विधवा महिलेला या वडीलोपार्जित घरामध्ये जागा मिळत नाही, तिच्या नावाची नोंद घर उतारा वरती होत नाही, तोपर्यंत सुवर्णा बाबासाहेब कदम यांचे उपोषण सुरुच राहील.याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे. असा इशारा देण्यात आला होता. परंतु याप्रकरणी वरील मान्यवरांसह वैभववाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री परब, विस्तार अधिकारी पंचायत श्री हांडे, यांच्या शी साधकबाधक चर्चा करून सुवर्णा बाबासाहेब कदम यांनी जिथे घर बांधत आहे तिथे कुणी ही अडथळा करणार नाहीत तसं हमीपत्र तिच्या दिराकडून दिनांक २५/८/२१ पर्यंत मा. अध्यक्षा सौ संजना सावंत यांच्या कडे सादर करण्यात येईल असे सौ. सरपंच कुर्ली,उपसरपंच अंबाजी हुंबे, ग्रामसेवक यांनी कबूल केले.
घर पूर्ण होईपर्यंत त्याच गावातील वाडीमध्ये भाड्याने घर देण्याचे सौ. सरपंच उपसरपंच अंबाजी हुंबे यांनी कबूल केले. अशा प्रकारे तिला न्याय मिळवून दिला.
यामध्ये माजी अध्यक्ष मा. संदेश सावंत यांचा सिंहाचा वाटा आहे, असे रावजी गंगाराम यादव जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा सिंधुदुर्ग यांनी सांगितले.