गोरेगाव मिररब्रेकिंगमुंबई
‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’, लंडन ने घेतली मुंबई चे उपमहापौर अॅड. सुहास वाडकर यांच्या कार्याची दखल

मुंबई:मुंबई चे उपमहापौर अॅड. सुहास चंद्रकांत वाडकर यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन कड़ून “सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट” देऊन गौरव करण्यात आला.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन चे यूरोप चे अध्यक्ष विल्यम जेजलर यांच्या मार्गदर्शनाख़ाली जगभरात ७० देशामध्ये करोनामुक्ती साठी जनजागृति केली जात आहे. तसेच करोना मुक्ती साठी कार्य करण्याची प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट (स्वित्झर्लंड) ने व्यक्ती व संस्था ना सम्मानित करण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन चे राष्ट्रीय सचिव डॉक्टर दीपक हरके यांनी मुंबई चे उपमहापौर अॅड. सुहास चंद्रकांत वाडकर यांना बिएमसी मुख्यालय, सिएसटी येथे सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट (स्वित्झर्लंड) ने सम्मानित केले.