मुंबई

वरळी हिट अँड रन : राजेश शाह यांची शिवसेनेतून हकालपट्टी

मुंबई – वरळी हिट हिट अँड रन प्रकरणी शिवसेना शिंदे गटाने उपनेते राजेश शाह यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. दरम्यान राजेश शाह यांना अटक झाली होती. पण न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राजेश शाह यांचा मुलगा मिहीरवर वरळीमध्ये एका महिलेला चिरडल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

राजेश शाह हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते होते. त्यांच्या मुलाने रविवारी सकाळी वरळीत रस्त्यावरून जाणाऱ्या दाम्पत्याला उडवले होते. तसेच सदर महिलेला जवळपास दीड किलोमीटरपर्यंत फरफटत देखील नेले होते. यात महिलेचा मृत्यू झाला होता, तर पती जखमी झाला होता. सदर प्रकरणानंतर आरोपी मिहीरने तिथून पळ काढला होता. अपघातानंतर आरोपी मिहीरने वडिलांना फोन केला होता. यावेळी राजेश शाहांनी मुलाला पळून जाण्याचा सल्ला दिला होता. तसेच, चालकाला आपण गुन्ह्याची जबाबदारी घेण्यास सांगू असे सांगितले होते. मिहीर पळून गेल्यानंतर वडील राजेश शाह घटनास्थळी आला होता. त्याठिकाणी चालक राजऋषी बिडावत याला जबाबदारी घेण्यास सांगितल्याचा आरोप आहे.

दरम्यान पोलिसांनी राजेश शाह आणि चालक राजऋषी बिडावत या दोघांना अटक केली होती. राजेश शाहला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, तर राजऋषी बिडावतला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने अटक बेकायदेशीर ठरवत राजेश शाहाला जामीन मंजूर केला होता. राजेश शाहावर आरोपीला पळू जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे. आरोपी मिहीर तीन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याला अखेर मुंबई पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याच्यासोबत त्याची आई आणि बहिणीला देखील अटक करण्यात आली आहे. त्याला पळून जाण्यात वडिलांसह आई आणि बहिणीने मदत केल्याचे तपासात समोर आले. सदर प्रकरणावरून शिंदे गटाने राजेश शाहांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!