ब्रेकिंग
सकारात्मक बातमी! राज्यातली कोरोना रुग्ण संख्या घटली,मुंबईत रुग्ण संख्या आली हजाराच्या आत

मुंबई:- राज्यात आता कोरोना रुग्ण संख्येत उतार होताना पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाच्या १४ हजार ३७१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासात ३० हजार ०९३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
तर राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत ३२२१ ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी १६८२ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.
मुंबईमधील कोरोना परिस्थिती:-
मुंबईत नव्याने आढळणाऱ्या कोरोना बांधितांच्या संख्येत आता बऱ्यापैकी घट झाली आहे. सोमवारी एक हजारांखाली गेलेली रुग्णसंख्या आजतर आणखी कमी झाली आहे. मागील २४ तासांत कोरोनाचे नवे ८०३ रुग्ण आढळले असून १ हजार ८०० जण कोरोनामुक्त झाले आहेत.