उद्या पासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन! हिंदी सक्ती, शक्तीपीठ मार्गावरुन वरुन विरोधक घेरणार

मुंबई : उद्या सोमवारपासून (दि . 30 जून) राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच राज्यामध्ये हिंदीवादाला तोंड फुटलं होते . ऐन अधिवेशनाच्या तोंडावर सरकारने यासंदर्भातील जीआर अखेर मागे घेऊन करून स्वतः ची काही प्रमाणात सुटका करून घेतली आहे. सरकारने घेतलेल्या पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या निर्णयाविरोधात मनसे, ठाकरे गटासह सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली होती .त्याचबरोबर त्याचबरोबर शक्तिपीठ महामार्ग, कर्जमाफी, लाडकी बहीण आदी मुद्देही चर्चेत येणार आहेत.
शक्तीपीठ महामार्गाला राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले आहेत. शक्तीपीठ विरोधात कोल्हापूरसह बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी येत्या १ जुलै रोजी राज्यव्यापी चक्का जाम आंदोलनाचीही घोषणा केली आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर या मुद्द्यावरुनही विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहेत.
शक्तिपीठ महामार्ग, कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेवरुन सरकारला घेरण्यासाठी विरोधक रणनिती आखणार आहेत. याचबाबत विरोधकांची एक बैठक पार पडणार आहे. थोडक्यात, उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या आक्रमक भूमिकांमुळे सरकारची चांगलीच कसोटी लागणार आहे.