महाराष्ट्र

मोबाईलद्वारे अश्लील जाळ्यात अडकवणारा; प्रसाद तामदार उर्फ ‘प्रसाद बाबा’ला पोलिसांनी अटक!

पुणे : हल्ली बनावट बाबांचे मोठे पेव फुटले असून भक्तांच्या मोबाईलमध्ये छुप्या पद्धतीने अॅप डाउनलोड करून त्यांना अश्लील कृत्ये करायला लावणारा पुण्यातील प्रसाद बाबा उर्फ प्रसाद तामदार हा समलैंगिक असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. पुण्यातील सुस भागात मठ असलेल्या प्रसाद बाबाने आपल्याशी लैंगिक चाळे केल्याची तक्रार त्याच्या एका भक्ताने केल्यानंतर त्याच्याविरोधात तक्रार देण्यासाठी आणखी पंधरा तरुण समोर आलेतपुरुष भक्ताचे अंग चोळून त्याला अंघोळ घालणारा प्रसाद बाबा उर्फ प्रसाद तामदारच प्रस्थ गेल्या काही वर्षात पुणे आणि परिसरात वाढलं होते. इंस्टाग्रामवर या बाबाचे दीड लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. त्यांच्या कमेंट्स पाहून प्रसाद बाबा आपल्याही आयुष्यातील अडचणी दूर करेल या अपेक्षेने भक्तांची गर्दी त्याच्या या पुण्यातील सुस मधील ब्रह्मांडनायक वाढत चालली होती.

प्रसादचे वडील भीमराव दातीरने दिव्य साक्षात्कार झाल्याचा दावा करत हा मठ काही वर्षापूर्वी सुरु केला. पुढे सी ए पर्यंतच शिक्षण झाल्याचा दावा करणारा प्रसादने 2022 मध्ये स्वतः या मठात बाबा बनण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय भक्तांकडून पैसे उकळण्याबरोबरच त्यांच्याशी समलैंगिक संबंध प्रस्थापित करता यावेत यासाठी होता.

त्यासाठी प्रसाद बाबा त्याच्या मठात आलेल्या भक्तांचे मोबाईल फोन मागून घ्यायचा. ग्रहदोष असल्याने मोबाईलमध्ये कंपास अॅप डाउनलोड करावं लागेल असं कारण तो द्यायचा. मात्र ते अॅप डाउनलोड करताना तो एअर ड्रॉइड कीड हे आणखी एक अॅप चोरून डाउनलोड करायचा. पालकांना आपल्या मुलांवर आणि त्यांच्या मोबाईल एक्टिव्हीटीवर नजर ठेवता यावी यासाठी या एअर ड्रॉइड कीड या एपची निर्मिती करण्यात आलीय. या एपमुळे भक्ताच्या संपूर्ण मोबाईलचा एक्सेस प्रसाद बाबाला मिळायचाच. भक्ताच्या मोबाईलमधील कॅमेरातून दिसणारी सगळी माहिती तो गोळा करायचा आणि त्याचा उपयोग भक्ताला प्रभावित करण्यासाठी करायचा. आपण आज कोणत्या रंगाचे कपडे घातले आहेत आणि आज आपण कुठे कुठे गेलो होतो हे सर्व प्रसाद बाबाला दिव्य साक्षात्कार झाला असल्याने समजल्याच भक्तांना वाटायचं आणि त्यांचा प्रसाद बाबावरचा विश्वास आणखीनच दृढ व्हायचा.

त्यानंतर प्रसाद बाबा विश्वास संपादन केलेल्या तरुण भक्तांना सलग दोन दिवस केवळ तीन तास झोप घेण्याचा सल्ला द्यायचा. त्यानंतर त्या भक्ताला या मठात बोलावून पुढच्या अघोरी विद्येच्या क्रिया करण्यासाठी सर्व कपडे काढून फक्त शाल पांघरून झोपायला सांगायचा . सलग दोन दिवस झोप न मिळाल्याने तो भक्त झोपी गेला की प्रसाद बाबा त्याच्यासोबत लैंगिक चाळे सुरु करायचा आणि तो भक्त जागा झाल्यावर तुझ्या सगळ्या समस्या माझ्याकडे घेतो आहे, असं सांगत त्या भक्ताला लेगिक संबंध ठेवायला भाग पडायचा.

पुणे जिल्ह्यातील देहूरोड भागातील जे 39 वर्षांच्या बांधकाम व्यवसायिकाच प्रसाद बाबाने असंच लेगिक शोषण केलं. तसाच प्रकार प्रसाद बाबाने त्या बांधकाम व्यावसायिकाच्या मेहुण्यासोबत करण्याचा प्रयत्न केला असता एअर ड्रॉपर अॅपमुळे त्या मेहुण्याच्या मोबाईलमधील मेमरी फुल झाल्याचं नोटिफिकेशन आलं आणि बाबाच बिंग फुटलं. त्यानंतर या बांधकाम व्यवसायिकाने आणि त्याच्या मेहुण्याने पोलिसांकडे तक्रार दिली आणि पोलिसांनी प्रसाद बाबाला बेड्या ठोकल्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!