महाराष्ट्रमुंबई

संजय मुळे राजर्षी शाहु राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने सन्मानित.

मुंबई : लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांना आदर्श मानून जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या छत्रपती संभाजी नगरच्या संजय मधुकर मुळे यांना राजर्षी शाहू स्मारक भवन, मिनी सभागृह, कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी दिक्षा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वासराव तरटे, मानवतावादी चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर इतर पुरस्कार प्राप्त मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी संजय मुळे यांना लोकमाता अहिल्यामाई होळकर सन्मान पुरस्कार, द एक्सलंसी आयकॉनिक अवॉर्ड आणि फाव अँण्ड फेअर्स यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या ‘बेस्ट स्पीच ॲण्ड स्पीकर ऑफ द इयर’, महाराष्ट्र भूषण जीवन गौरव, उद्योगश्री जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्याकडून नॅशनल इंडस्ट्रीयल एक्सलंस पुरस्कार, क्वालिटी ब्रॅण्ड टाईम्स तर्फे क्वालिटी ब्रँड इंडिया पुरस्कार, एज्युकेशन ॲण्ड ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन तर्फे राष्ट्रीय निर्माण रत्न पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार अशा विविध पुरस्कारांचेही ते मानकरी राहिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!