महाराष्ट्रमुंबईसाहित्यिक

यशवंतराव चव्हाणांची पणती ११व्या वर्षी लेखिका होतेय !

‘द ट्रेल डायरीज’ कादंबरीचे ५ जुलैला प्रकाशन

मुंबई / रमेश औताडे : महाराष्ट्राचे शिल्पकार आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पणती अमायरा चव्हाण वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी लेखिका म्हणून पदार्पण करत आहे. वाचनामुळे आपल्याला जगाचे भान मिळते, असे सांगणाऱ्या यशवंतराव चव्हाण घराण्याच्या परंपरेत वाढलेल्या अमायराने ‘द ट्रेल डायरीज’ ही साहसकथा लिहून बालसाहित्याच्या विश्वात दमदार पाऊल टाकले आहे.

ही कादंबरी देशातील अग्रगण्य प्रकाशनसंस्थांपैकी एक असलेल्या पेंग्विन रॅण्डम हाऊसच्या सहसंस्थेने पारट्रीचने प्रकाशित केली आहे. साहसी आणि कल्पनारम्य कथानक असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन ५ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात होणार आहे.

या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे कॅबिनेट मंत्री आशिष शेलार उपस्थित राहणार असून, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालिका निधी चौधरी, प्रसिद्ध चरित्रलेखिका रीता राममूर्ती गुप्ता, आणि बालसाहित्यिक राजीव तांबे यांचाही मान्यवर पाहुण्यांमध्ये समावेश आहे.

अमायरा चव्हाण हिच्या या कादंबरीतून एका नव्या पिढीच्या विचारांचे, स्वप्नांचे आणि कल्पनाशक्तीचे दर्शन घडणार आहे. वयाच्या अकराव्या वर्षीच लेखिका झालेल्या अमायराचे हे पुस्तक नव्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!