महाराष्ट्रकोंकण

रत्नागिरीजवळ भूमिगत वीजवाहिन्यांचा पुन्हा खेळखंडोबा – करोडो रुपये वाया जाण्याचा धोका

रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजीक करोडो रुपये खर्चुन तयार करण्यात आलेला भूमिगत वीजवाहिनी प्रकल्पाचा पुन्हा एकदा खेळखंडोबा झाल्याचे चित्र आहे. हा प्रकल्प नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे कोलमडून पडला. महावितरण विभागाही या संदर्भात देखभाल दुरुस्ती करण्यासाठी चालढकल करत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे गेले काही दिवस मिया गावातील पथदिवे बंद पडल्याने परिसरात काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. राष्ट्रीय चक्रिवादळ धोके निवारण प्रकल्प २ अंतर्गत समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांमध्ये भूमिगत वीजवाहिनी बसवण्यात आली आहे जाकिमिया, सडामिया आणि मियाबंदर परिसरात या भूमिगत वीजवाहिन्यांची कामे करण्यात आली आहेत, ती व्यवस्थितपणे पूर्ण झालेली नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!