महाराष्ट्रमुंबई
मनसे नेते अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात; मीरा भायंदर मध्ये मोर्चा काढण्याआधीच केली अटक

ठाणे : मराठी भाषेच्या हक्कांसाठी मिरा रोड येथे आज (मंगळवार) मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या मराठी मोर्च्याआधीच नाट्यमय घडामोड घडली. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्षअविनाश जाधव यांना पोलिसांनी आज पहाटे 3.30 वाजता त्यांच्या ठाण्यातील राहत्या घरातून ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी आधीच जाधव यांना मिरा भाईंदर क्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई करणारी नोटीस बजावली होती. उद्याच्या रात्रीपर्यंत त्यांच्यावर ही बंदी लागू होती. मात्र, मोर्चात त्यांचा सहभाग होणार असल्याची शक्यता गृहित धरून पोलिसांनी सकाळच्या आधीच ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे.