गोरेगावातील मोतीलाल नगर चे रहिवासी करणार संघर्ष-युवराज मोहिते

मुंबई : म्हाडा आणि अदानी समूहादरम्यान मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाबाबत झालेल्या कराराचा आम्ही तीव्र विरोध आणि निषेध करतो. हा निर्णय मोतीलाल नगरच्या रहिवाशांना विश्वासात न घेता घेण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्येक रहिवासी रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशारा मोतीलाल नगर विकास समितीचे अध्यक्ष युवराज मोहिते यांनी दिला आहे.
या पुनर्वसनात प्रत्येक रहिवाशांना २००० चौरस फूट कार्पेटचं घर मिळावं अशी मागणी मुख्यमंत्री आणि म्हाडा यांना वारंवार निवेदने देऊन केली होती. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आश्वासन देवूनही लोकांची फसवणूक केली आहे, असा रहिवाशांचा आरोप आहे.
लोकांशी चर्चा न करता अदानी समुहासोबत करार न करणं हे अत्यंत संतापजनक आहे. या करारात प्रत्येक रहिवाशांना १,६०० चौरस फूट बिल्ट-अप एरियाचा उल्लेख आहे, जो इथल्या रहिवाशांची घोर फसवणूक करणारा आहे. कोणतीही पारदर्शकता या करार करताना पाळलेली नाहीय. ही मनमानी रहिवासी मान्य करणार नाही. अदानीच्या सोयीने काम करणाऱ्या सरकारविरुद्ध आम्ही संघर्ष करू, असंही युवराज मोहिते यांनी सांगितलं.