महाराष्ट्रक्रीडादेशविदेशमुंबई

रत्नागिरीचा अविराज गावडे इंग्लंडच्या मैदानात चमकतोय – तिसऱ्यांदा ‘मॅन ऑफ द मॅच’!

रत्नागिरी : रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे हा सध्या कौंटी क्रिकेट स्पर्धां खेळण्याकरिता इंग्लंडमध्ये असून तो मिडलसेक्स पेशवा संघाकडून खेळत आहे. नुकत्याच झालेल्या कौंटी स्पर्धेत मिडलसेक्स संघ व रिंजेटस पार्क या संघात झालेल्या सामन्यामध्ये अविराज याने गोलंदाजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षणात आपले कौशल्य दाखवत संघाला विजयी करण्यात मोठा वाटा उचलला. त्यामुळे त्याला या सामन्यात सामनावीर म्हणून पुरस्कार घोषित करण्यात आला.

मिडलसेक्स संघाकडून खेळताना त्याने सुरूवातीला गोलंदाजी करताना आठ ओव्हरमध्ये फक्त १६ रन्स देवून ४ विकेटस काढून प्रतिस्पर्धी संघाला हादरा दिला. यामध्ये २ विकेट त्याने क्लिनबोल्ड द्वारे तर दोन विकेस कॅच आऊटद्वारे घेतल्या. क्षेत्ररक्षण करताना त्याने चपळाई दाखवत एका फलंदाजाला रनआऊटही केले. आपल्या मिडलसेक्स संघासाठी फलंदाजी करताना त्याने ओपनिंगला येवून ६० बॉलमध्ये ४७ रन्स काढल्या. त्यामध्ये ५ चौकार व एक सिक्स मारत ७८ च्या सरासरीने रन्स केल्या व आपल्या संघाला विजय मिळवून दिला. अविराज याने दाखवलेल्या दमदार कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार घोषित करण्यात आला. याआधी अविराज याने आधीच्या दोन सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळवले होते.

रत्नागिरीतील मराठी अविराज याने आपल्या दमदार कामगिरीमुळे इंग्लंडमध्ये छाप पाडली असून रत्नागिरी जिल्ह्याचे नावही उज्ज्वल केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!