महाराष्ट्र

पत्रकारांसाठी ‘एआय’चे प्रशिक्षण कौशल्यवर्धनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम -कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा ‘एआय’ मुळे पत्रकारिता अधिक तंत्रज्ञानयुक्त

मुंबई: जगभरात आता विविध क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमाने क्रांती घडत असून प्रसिद्धी माध्यमातही याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. ‘एआय’ तंत्रज्ञान अत्याधुनिक पत्रकारितेला नवा पैलू देत असून यामुळे पत्रकारांचा अमूल्य वेळ ही वाचणार आहे. प्रत्येक क्षेत्रात अपस्किलींगला खूप महत्व आहे हे लक्षात घेवून राज्यात असा नाविन्यपूर्ण उपक्रम कौशल्य विकास विभागाने राबविला असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता न नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथील पत्रकार कक्षात एआय संदर्भात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यान आले. तिसऱ्या दिवशीच्या सत्रात ‘एआय’ तंज्ञानाच्या वापरासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण सत्राला कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपुर्वा पालकर, एआय तज्ज्ञ किशोर जस्नानी,उपकुलसचिव राजेंद्र तलवारे, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दिपक भातुसे तसेच प्रिंट,इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमांचे पत्रकार यावेळी या प्रशिक्षणाला उपस्थित होते.

मंत्रालय आणि विधिमंडळ संघाच्या सदस्य पत्रकारांनी या प्रशिक्षण कार्यशाळेला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अत्याधिक आनंद झाला असल्याच्या भावना यावेळी कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी व्यक्त केली. नवनवीन तंत्रज्ञान आल्यानंतर नेहमीच मनुष्यबळासंदर्भात चर्चा होते. मात्र या तंत्रज्ञानाने अधिकाधिक रोजगार उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले. पत्रकारांना या कार्यशाळेचा दैनंदिन कामकाजात नक्कीच अधिक उपयोग करता येईल तसेच कामामध्ये अधिक तंत्रस्नेहीपणे काम करता येईल, असे कौशल्य मंत्री
मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे सरचिटणीस दिपक भातुसे यांनी कौशल्य,रोजगार, उद्योजकता न नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून चार दिवसीय एआय प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट असून या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा पत्रकारांना नक्कीच उपयोग होणार असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!