१५ ऑगस्टपर्यंत दिल्ली सोडू नका:मोदींनी दिल्या मंत्र्यांना सुचना…

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी(prime minister narendra modi)यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी पडला. त्यानंतर लगेच खातेवाटपही जाहीर झाले. नव्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नवनिर्वाचीत केंद्रीय कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची बैठक घेतली. मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मोदींनी नव्या मंत्र्यांना अनेक सूचना आणि सल्ले दिले आहेत. त्यात गरज नसताना माध्यमांना प्रतिक्रिया देणे टाळा, अनावश्यक वक्तव्ये टाळा, अशा सूचनांचा समावेश आहे. यासोबतच पंतप्रधान मोदींनी या मंत्र्यांना ५ महत्वाच्या सूचना केल्या आहेत.
१) १५ ऑगस्टपर्यंत नवनिर्वाचित मंत्र्यांनी दिल्ली सोडू नये.
२) महिन्याभरात म्हणजे १५ ऑगस्टपर्यंत मंत्रालयात हजर रहा.
३) मिळालेल्या मंत्रालयाचे कामकाज समजून घ्या.
४) अनावश्यक वक्तव्य नकोत.
५) जल्लोष मर्यादीत राहील याची काळजी घ्या.
केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांच्यासारख्या दिग्गजांसह १२ विद्यमान मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. या मंत्र्यांना त्यांच्या कामगिरीमुळे काढण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. मात्र मंत्रिपदावरुन बाजूला करण्यात आलेल्या मंत्र्यांना त्यांची कामगिरी किंवा क्षमतेमुळे डच्चू देण्यात आलेला नाही. मंत्र्यांच्या राजीनाम्याचा त्यांच्या कार्यक्षमतेशी संबंध नाही. तर जुन्या मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना दबाबदारी देण्यात आली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. तुम्ही ज्यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे, त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या. माध्यमांना गरज नसताना प्रतिक्रिया देणे किंका आक्षेपार्ह विधाने टाळा, अशी सूचना पंतप्रधानांनी या मंत्र्यांना केली आहे.