हिवाळ्यात ‘हार्ट अॅटक’च्या धोका अधिक, अशी घ्या काळजी!

हिवाळ्यात तापमानाचा पारा जसजसा घसरतो, तसतसे शरीरातील तापमान कायम ठेवण्यासाठी हृदयाला अधिक काम करावे लागते. त्यामुळेच उन्ह्याळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात हृदयासंबंधितच्या तक्रारी वाढल्याचे पाहायला मिळते.
हिवाळ्यात हृदयविकाराचा (हार्ट अॅटक) धोका अधिक असतो.थंडीच्या दिवसात हृदय निरोगी कसे ठेवावे, याबाबत तज्ज्ञांनी काही घरगुती टिप्स सांगितल्या आहेत.चला तर मग याबाबत जाणून घेऊ या.
टेन्शन घेऊ नका – हृदयाशी संबंधित आजारांचे मुख्य कारण, म्हणजे ताणतणाव.. सतत टेन्शनमध्ये असल्यास, थेट हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तीव्र तणावामुळे हृदयातील धमन्यांच्या आतील अस्तरात बदल होऊन छातीत जळजळ होते. रक्त गोठून ‘हार्ट अॅटक’ येऊ शकतो.
आनंददायी काम करा – मनाला आनंद देणारी कामे करा. मोकळ्या वेळात गाणी ऐकणे, पुस्तक वाचन, माळी काम, चित्रकला अशा गोष्टी केल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. योग, ध्यान-धारणा केल्याचाही फायदा होतो.
पुरेशी झोप घ्या – रोज पुरेशी झोप न झाल्याने हृदयाच्या आजाराचा धोका वाढतो त्यामुळे पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. काम करतानाही अधून-मधून ब्रेक घ्यायला हवा.
नियमित व्यायाम- हिवाळ्यात शक्यतो बाहेर जाऊन व्यायाम करणे टाळावे. मात्र, घरात रोज किमान अर्धा तास व्यायाम करायला हवा.
मीठ-साखरेवर नियंत्रण- अन्नात मोठ्या प्रमाणात मीठ, तसेच साखरेचा वापर मर्यादेत असावा. पदार्थांमध्ये सूर्यफूल किंवा मोहरीचे तेल वापरावे. रोजच्या जेवणात सलाड नि फळांचा समावेश करा.