महाराष्ट्रकोंकणक्राइम
मांडवी एक्सप्रेस मध्ये चढताना चिपळूण स्थानकात महिलेच्या दागिन्यांवर डल्ला…

चिपळूण : मांडवी एक्सप्रेसमध्ये चढत असताना एका प्रवासी महिलेच्या पर्समधून सुमारे दीड लाखांचे दागिने चोरट्याने लांबविल्याची घटना चिपळूण रेल्वे स्थानकात घडली आहे. याबाबत अक्षता मोरे (रा. विरार) यांनी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी मोरे या मुंबईला जाण्यासाठी मांडवी एक्सप्रेसमध्ये चढत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या खांद्यावरील लावलेल्या पर्समधील सोन्याचे दागिने लंपास केले.