
मुंबई: अधिवेशन कोणतेही असो, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यात नेहमीच झुंज होत असते. यात कधी कुणी पेपरवेट फेकतो तर कुणी कागदपत्रे फाडतो, अध्यक्षांच्या समोर वेल मध्ये जाऊन माईक खेचणे, गोंधळ घालणे हे तर नित्याचेच.. मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील ही भांडणांची परंपरा राजकारणाचा नित्य संपर्क असलेल्या राजभवन मधील खऱ्याखुऱ्या पक्ष्यांमध्ये पण पोहोचली की काय ? असे म्हणण्याची पाळी कालच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान आली. मोरांचे वास्तव्य असलेल्या राजभवनाच्या शांत परिसरात दोन मोरांमध्ये मोठी झुंज रंगली. एका मोबाईल कॅमेऱ्यात टिपलेली ही मोराची झुंज खास मिरर च्या वाचकांसाठी..
व्हिडियो पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..