उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे फोटो साठी एकत्र; पण दुरावा कायम…

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोपसमारंभ आज पार पडला. विधान परिषदेत उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना अंबादास दानवेंचे जोरदार कौतुक केलं. त्यानंतर विधिमंडळाच्या परिसरामध्ये फोटोसेशनवेळी अनोखा प्रसंग पाहायला मिळाला. अंबादास दानवेंच्या निरोपाचे फोटोसेशन सुरु असताना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे पुन्हा एकद समोरासमोर आले. एकाच फोटोफ्रेमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र बसले होते मात्र त्यांमध्ये फक्त एकाच खुर्चीचे अंतर होते. यावेळी दोघांनीही एकमेकांशी बोलणे टाळले. त्यानंतर आता या फोटोफ्रेमची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांचा निरोपसमारंभ पार पडल्यानंतर विधिमंडळपरिसरात परंपरेप्रमाणे फोटो सेशन घेण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडेच सर्वांच्या नजरा होत्या. सुरुवातील सत्ताधाऱ्यांसोबत फोटोसेशन पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे आगमन झालं. त्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह सर्व प्रमुख नेते उभे राहिले. त्यानंतर निलम गो-हे यांनी उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसण्यास सांगितले. नीलम गो-हे एकडे बसा म्हणून आग्रह करत होत्या मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांना नकार दिला. त्यानंतर ते नीलम गो-हे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शेजारी जाऊन बसले. मात्र यावेळी दोघांनीही एकमेकांना पाहिलं नाही किंवा संवादही साधला नाही. त्यामुळे या घटनेची जोरदार चर्चा सुरु झालीय.