नवी दिल्लीवाहतूक

गारपिटीचा जबरदस्त फटका! इंडिगोच्या विमानाचे नाक तुटले; 227 प्रवासी मात्र सुरक्षित

दिल्ली : दिल्लीवरून श्रीनगरच्या दिशेने जात असलेल्या इंडिगोच्याविमानातील प्रवाशांना आयुष्यभर विसरता येणार नाही, असा प्रसंग घडला. विमानश्रीनगरच्या दिशेने जात असताना अचानक गारपिटीच्या वादळात सापडले. गारांचा मारा इतका जोरात होता की, टर्ब्युलन्स निर्माण झाला. अचानक हे घडल्याने प्रवाशी जोरात ओरडायला आणि रडायला लागले. त्यामुळे विमानात प्रचंड गोंधळ झाला होता.दिल्लीवरून श्रीनगरकडे जात असलेल्या 6E2142 या विमानाला खराब हवामानाचा फटका बसला. दिल्लीवरून उड्डाण केल्यानंतर हे विमान सायंकाळी श्रीनगरच्या दिशेने निघाले होते. २२७ प्रवासी आणि विमानातील कर्मचारी घेऊन निघालेले हे रस्त्यातच गारपिटीच्या तडाख्यात सापडले. गारांचा मारा आणि खराब हवामानामुळे दृश्यमानता कमी झाल्याने विमानाच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे प्रवाशी घाबरले. प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. पण वैमानिकांनी प्रसंगावधान दाखवत विमान सुरक्षितपणे श्रीनगर विमानतळावर उतरवले. विमानाचे नाक तुटले असले, तरी सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!