कोंकणमहाराष्ट्र

“ज्यांचा एकही ग्रामपंचायत सदस्य नाही, अशा अदखलपात्र पक्षाच्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षाची दखल आपण घेत नाही”- मंत्री उदय सामंत

रत्नागिरी : डांबर घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या विरोधकांच्या तोंडाला आजवर रत्नागिरीतील जनतेने मतदानरूपी डांबर फासलेले आहे. त्यामुळे ज्या पक्षाचा एक ग्रामपंचायत सदस्य नाही, अशा अदखलपात्र पक्षाच्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षाची दखल आपण घेत नाही. दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी आपण का संपलोय यावर जर जास्त लक्ष दिले तर बरे होईल, अशी टीका पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. सामंत म्हणाले, रत्नागिरीत आलेल्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या पक्षातील लोक आळखत नाहीत. त्यांचे नावही त्यांना माहित नाही, अशी अवस्था आहे.

तर गेली २५ वर्षे रत्नागिरीतील जनता आपल्या मतदानरूपी आशीर्वाद देत आहे. माझ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना येथील जनतेने वेळोवेळी मतदानातून उत्तर दिले आहे. त्यामुळे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या टीकेची दखल घेण्याची मला आवश्यकता वाटत नाही. काल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या स्वागताचे बॅनर आमच्याच बॅनरवर लावले गेले ते कुणी व कसे लावले याची सर्व माहिती आपल्याकडे आहे. आपण राजकीय संस्कृती जपणारे कार्यकर्ते आहोत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!