अंध विद्यार्थ्यांसोबत सेवाकुंड संस्थेचा उपक्रम

मुंबई / रमेश औताडे : समाजातील वंचित,अनाथ,अंध अपंग घटकांना मदतीचा हात देऊन अशा घटकांना मुख्य सामाजिक प्रवाहात आणण्याचे सेवाभावी कार्य करणाऱ्या सेवाकुंड ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या आधारस्तंभ आयुष्यमती जयश्री अनिलकुमार गायकवाड यांचा वाढदिवस नुकताच ठाण्यामध्ये अंध विद्यार्थ्यांसोबत अत्यंत सहृदयतेने साजरा करण्यात आला.
माणुसकीच्या मूल्यांची जपणूक करणाऱ्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या अंध विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे जयश्रीताईंच्या हस्ते करण्यात आले. आयुष्यात प्रथमच मुंबई पाहिलेल्या या अंध विद्यार्थयांनी या निमित्ताने मौजमजा करत जीवाची मुंबई केली. याच वाढदिवस सोहळ्याचे औचित्य साधून बौद्ध संस्थेच्या वतीने जयश्री ताई गायकवाड याना माता रमाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याला एमएमआरडीसी चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड, अभिनेत्री मानसी नाईक, लातूरचे माजी खासदार आणि सुप्रीम कोर्टाचे वकील डॉ. सुनील गायकवाड, सेवाकुंड ट्रस्ट चे अध्यक्ष अश्वजीत गायकवाड, उपाध्यक्ष नंदकिशॊर शहाडे, सचिव अभिजित गायकवाड, भाजप नेते विश्वजित यगायकवाड, उद्योजक विजयकुमार गायकवाड सेवाकुंड ट्रस्टी संजय कर्णिक, अतुल भोसले, ऍड. महेंद्र दलालकर, महेश चौहान, अनिल सोनपाटकी, पुणे सेवाकुंड प्रमुख राजेश सूर्यवंशी, भरत मिसाळ, रामलिंग पटसाळगे, राजकुमार पाटील यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.