गोरेगाव मिररमुंबई

दिंडोशीत आषाढी एकादशी निमित्त आयोजित लहानपण देगा देवा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद!

मुंबई (प्रतिनिधी) शिवसेना मुख्य प्रतोद, विभाग प्रमूख, आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शना खाली आणि कृष्णाई सेवा संस्थाचे संस्थापक रमेश कळंबे आणि डिजिटल रंगमंच संस्थापक अध्यक्ष अविनाश वाघमारे यांच्या माध्यमातून दिंडोशी विधानसभा क्षेत्रात आषाढी एकादशी निमित्त, “लहानपण देगा देवा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्याक्रमाचे संचलन डिजिटल रंगमंचाच्या सर्व सहकाऱ्यांनी केले.

या आनंद सोहळ्याप्रसंगी संत वांग्मय परंपरा, भारुड, ओवी, गवळण, अभंग, दोहे, गाणी इत्यादी संगीत अभिनय आणि नृत्याच्या माध्यमातून शालेय मुलांना दाखवण्यात आले. दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील पंधरा पेक्षा अधिक शाळेतून अंदाजे १००० पेक्षा अधिक बालप्रेक्षकांनी या सोहळ्यात सहभागी होत आनंद लुटला. या सोहळ्यात हरिपाठाच्या माध्यमातून ह.भ.प. श्री देवराम महाराज जाधव यांच्या वाणीतून माऊलीच्या गजरात साक्षात प्रती दिंडी उभी करण्यात आली.
या कार्यक्रमाला आमदार सुनिल प्रभू यांच्या समवेत दिंडोशी विधानसभा संघटक विष्णू सावंत, युवासेना कार्यकरणी सदस्य, अंकित प्रभू, शिवसेना प्रभारी संघटक कांतीमोहन मिश्रा, उपविभाग प्रमुख प्रदीप निकम, वृंदाताई पालेकर, वेदमूर्ती पैठणकर गुरुजी, अनुदत्त विद्यालायचे प्राचार्य संस्थापक रामचंद्र आदवळे सर, युवासेना दिंडोशी विभाग अधिकारी प्रशांत मानकर व सर्व शिवसेना युवसेना पदाधिकारी यांच्या सह लहान मुले व पालक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृष्णाई सेवा संस्थाचे संस्थापक, शाखा प्रमुख रमेश कळंबे, अध्यक्ष विष्णू कळंबे, सेक्रेटरी शिवाजी गोळे, खजिनदार ह.भ.प. मारुती कळंबे, उपाध्यक्ष नारायण जाधव, उपखजीनदार ह.भ.प. राजेंद्र कळंबे, महेंद्र जाधव, विष्णू मा. कळंबे, राजेंद्र गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!