रत्नागिरी शहरातील ‘बांग्लादेश वस्ती’ हे नाव नोंदणीतून हद्दपार केलं; नगरपरिषदेचा निर्णय जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील ‘बांग्लादेश वस्ती’ हे नाव नोंदणीतून हद्दपार केले, या परिसराचे नाव ‘श्री देव विश्वेश्वर मंदिर मार्ग’ असे ठेवण्याचे निर्देश खुद्द पालकमंत्री उदय सामंत यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. उद्यापासूनच हे नवीन नाव अधिकृतपणे लागू करण्यात यावे, असे आदेश त्यांनी दिले. या निर्णयामागे रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याचे विशेष योगदान असल्याचे सांगत, पालकमंत्र्यांनी त्यांचे कौतुकही केले.