मोठी बातमी:’व्हाय धीस कोलावरी डी’ चा गायक व रजनीकांतचा जावई धनुषने केली आपल्या घटस्फोटाची घोषणा

चेन्नई- अभिनेता धनुषने सोशल मीडिया अकाऊंटवरून पत्नी ऐश्वर्यापासून वेगळं होत असल्याची घोषणा केली आहे. तब्बल १८ वर्षानंतर हे दोघे पती-पत्नी विभक्त होणार आहे. ऐश्वर्या ही दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे.धनुष आणि ऐश्वर्याने वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्द धनुषने याबद्दल ट्वीट करून आम्ही वेगळ होत असल्याचं जाहीर केलं आहे. धनुषने अचानक पोस्ट करून ही घोषणा केल्याने त्याच्या फॅन्सला मोठा धक्का बसला आहे.
🙏🙏🙏🙏🙏 pic.twitter.com/hAPu2aPp4n
— Dhanush (@dhanushkraja) January 17, 2022
धनुषने ट्विटरवर अत्यंत छोटी पोस्ट लिहून घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं आहे. १८ वर्षांची सोबत. मैत्री, पती-पत्नी, आई-वडील आणि एकमेकांचे शुभचिंतक बनून आम्ही एक ग्रोथ, समजदारी आणि सहजीवनाचा प्रवास केला होता, असं धनुषने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आज आम्ही जीवनाच्या अशा टप्प्यावर उभे आहोत, जिथून आमचे मार्ग वेगवेगळे होत आहेत. ऐश्वर्या आणि मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांपासून वेगळे होऊन स्वत:चा शोध घेऊ. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमच्या प्रायव्हसीची कदर करून आम्हाला त्याच्याशी डील करू द्या, अशी भावूक पोस्ट धनुषने लिहिली आहे.