ब्रेकिंग
वांद्र्यात पाच मजली इमारत कोसळली; पाच जण अडकल्याची भीती

मुंबई:- मुंबईतल्या वांद्रे पूर्व भागातली एक पाच मजली इमारत कोसळल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये पाच जण अडकून पडल्याची भीती महापालिकेकडून व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबद्दलची माहिती दिली आहे.वांद्रे पूर्व परिसरातल्या बेहराम नगरमधली एक पाच मजली इमारत आज कोसळली. याबद्दलची माहिती मिळतात महापालिकेने घटनास्थळी पोहोचून बचावकार्याला सुरूवात केली.
अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, ६ रुग्णवाहिका घटनास्थळी बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत.सध्या युद्धपातळीवर बचाव कार्य करण्यात येत आहे.