मुंबईमहाराष्ट्रराजकीयराष्ट्रीय

भाजपचे संकल्पपत्र प्रसिद्ध

 एमएमसी न्यूज नेटवर्क

मुंबई : भाजपाने आज महाराष्ट्र विधानसभेसाठी आपले संकल्पपत्र प्रसिद्ध केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजपाचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी नेते यावेळी उपस्थित होते.

  1. लाडक्या बहिणींना दरमहा मिळणार 2,100 रुपये , म्हणजेच वर्षाला 25,200 रुपये
  2. शेतकऱ्यांना मिळणार कर्ज माफी शेतकरी सन्मान निधीत वाढ 12,000 रुपये ऐवजी 15,000 रुपये मिळणार आणि MSP वर 20% अनुदान देणार
  3. प्रत्येक गरीबाचं स्वप्न पूर्ण होईल, भाजप-महायुती अन्न सुरक्षा आणि हक्काचं घर देईल
  4. वृद्ध पेन्शन धारकांचा सन्मान, महिन्याला ₹2100 म्हणजेच वर्षाला ₹25,200 चा आधार
  5. राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर राहणार
  6. 10 लाख विद्यार्थ्यांना मिळणार ₹10,000 विद्यावेतन आणि 25 लाख रोजगार निर्मिती करणार
  7. ग्रामीण विकासाला मिळणार नवी दिशा 45,000 गावांत पांदण रस्त्यांची बांधणी होणार
  8. अंगणवाडी आणि आशा सेविकांना ₹15,000 वेतन आणि विमा संरक्षण
  9. वीज बिलात 30% कपात होणार, सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार
  10. सरकार स्थापनेनंतर 100 दिवसांच्या आत ‘व्हिजन महाराष्ट्र @2028’ सादर करण्यात येईल
  11. महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य भाजपा करणार साकार
  12. मेक इन महाराष्ट्र बनवेल राज्याला फिनटेक आणि AI ची राजधानी नागपूर, पुणे, नाशिक सारखी शहरे बनणार एयरोस्पेस हब
  13. खतांवरील SGST कर मिळणार परत सोयबिनला प्रति क्विंटल किमान रु. 6000/- भाव देणार
  14. 2027 पर्यंत 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवणार 500 बचतगटांसाठी 1000 कोटींचा फिरता निधी उपलब्ध होणार
  15. अक्षय अन्न योजनेद्वारे कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना मिळणार मोफत अन्नधान्य
  16. महारथी आणि अटल टिंकरिंग लॅब्स योजनेतून सर्व शासकीय शाळांमध्ये रोबोटिक्स आणि AI चे प्रशिक्षणाची संधी होईल उपलब्ध
  17. महाराष्ट्रात होणार कौशल्य जनगणना उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ निर्माण करणार
  18. प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करून घडवणार 10 लाख उद्योजक
  19. एससी, एसटी, ओबीसी समाजातून उद्योजक घडवण्यासाठी 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज
  20. ओबीसी, एसबीसी, इडब्लुएस आणि वीजेएनटी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती मिळणार
  21. युवकांसाठी स्वामी विवेकानंद युवा स्वास्थ्य कार्ड आणिवार्षिक आरोग्य तपासणी
  22. महाराष्ट्राच्या गौरवशाली किल्ल्यांचे संवर्धन आणि ऐतिहासिक वारशाचे जतन
  23. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्य धोरण आधार-सक्षम सेवा तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र ओपीडी
  24. सक्तीच्या धर्मांतरणाविरोधात कायदा करणार फसव्या धर्मांतराला आळा बसणार
  25. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानव-वन्यजीव संघर्ष टाळणार तसेच वन्यप्राण्यांपासून होणारी जीवितहानी रोखणार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!