महाराष्ट्रक्रीडादेशविदेश

महाराष्ट्राच्या लेकीने रचला इतिहास; दिव्या देशमुख ठरली वर्ल्ड चेस चॅम्पियन

वृत्तसंस्था : अवघ्या १९ व्या वर्षी प्रतिस्पर्धी कोनेरू हम्पी हिचा पराभव करत महाराष्ट्राच्या दिव्या देशमुख हिने इतिहास रचला असून ती भारताची पहिली वर्ल्ड वुमन चेस चॅम्पियन ठरली आहे.

वर्ल्ड चेस चॅम्पियन फायनलमध्ये दोन्ही कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख या दोन्ही भारताच्या लेकी होत्या. त्यामुळे भारतातच हा वर्ल्ड कप येणार हे निश्चित होतं. मात्र दोघीपैकी या वर्ल्ड कपवर कोण नाव कोरणार? याची उत्सूकता होती. मात्र दिव्याने चाली करत कोनेरुला पराभवाची धुळ चारली. विजय मिळवताच दिव्याच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. तर दुसऱ्या बाजूला कोनेरु हंपीला अंतिम फेरीत येऊन पराभूत व्हावं लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलंय.

दिव्या आणि कोनेरु यांच्यातील अंतिम फेरीतील 2 सामने बरोबरीत राहिले. अंतिम फेरीतील पहिला सामना शनिवारी 26 जुलैला झाला. दिव्याला तेव्हाच वर्ल्ड कप जिंकण्याची संधी होती. मात्र दिव्याकडून अखेरच्या क्षणी चूक झाली. कोनेरुने याचाच फायदा घेत कमबॅक केलं आणि अंतिम फेरीतील पहिला सामना 1-1 ने बरोबरीत राहिला. त्यानंतर रविवारी 27 जूलैला अंतिम फेरीतील दुसरा सामनाही बरोबरीत सुटला. दुसरा सामनाही 1-1 ने बरोबरीत सुटला. त्यामुळे आता ट्रायब्रेकरने विजेता निश्चित होणार असल्याचं स्पष्ट झालं.

अंतिम फेरीतील दोन्ही सामने हे क्लासिकल फॉर्मेटमध्ये खेळवण्यात आले. मात्र टायब्रेकर रॅपिड फॉर्मेटमध्ये खेळवण्यात येणार होता. कोनेरुला या फॉर्मेटमध्ये दिव्याच्या तुलनेत फार अनुभव आहे. त्यामुळे टायब्रेकरमध्ये कोनेरु दिव्यावर वरचढ ठरण्याची शक्यता होती. मात्र दिव्याने गेम फिरवला.

दिव्याने आज सोमवारी 28 जुलैला ट्रायब्रेकरमध्ये सामना एकतर्फी केला. दिव्याने कोनेरुला चाली करत करत चुका करण्यास भाग पाडलं. दिव्याने यासह कोनेरुला मागे टाकलं आणि इतिहास घडवला. दिव्या यासह भारतासाठी चेस वर्ल्ड कप जिंकणारी पहिली महिला ठरली. विशेष म्हणजे दिव्या आता चौथी महिला ग्रँडमास्टर ठरणार आहे. विशेष म्हणजे दिव्याने ही कामगिरी भारताची पहिल्या ग्रँडमास्टरला पराभूत करत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!