सलमान खान ३२ वर्षांच्या करिअरमध्ये करणार पहिल्यांदाच बायोपिक?
मुंबई: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने त्याच्या ३२ वर्षांच्या करिअरमध्ये अनेक कॉमेडि-ड्रामा ते अॅक्शन आणि रोमॅन्टिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता इतक्या वर्षांनंतर तो पहिल्यांदाच एका बायोपिकमध्ये काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे राजकुमार गुप्ता करणार आहेत. या चित्रपटात सलमान ‘ब्लॅक टायगर” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारतीय गुप्तहेर रवींद्र कौशिक यांची भूमिका साकारणार आहे.
‘पिंकव्हिला’ने दिलेल्या वृत्तानुसार, हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे. भारतीय इतिहासातील अविश्वसनीय कथेवर आधारीत या चित्रपटाची पटकथा असेल. साजिद नाडियाडवालाबरोबर सलमानचे काम पूर्ण झाल्यानंतर या चित्रपटाच्या कामाला सुरुवात होईल. हा चित्रपट भारतीय हेर, रवींद्र कौशिक यांच्या जीवनावर आधारित आहे. ते ‘ब्लॅक टायगर’ म्हणून ओळखले जातात.
एवढंच नाही तर आतापर्यंचचे सर्वोत्कृष्ट हेर म्हणून ते ओळखले जातात. राजकुमार गुप्ता हे गेल्या ५ वर्षांपासून त्यांच्या आयुष्यावर रिसर्च करत होते आणि आता त्यांच्याकडे चित्रपटासाठी संपूर्ण कथा तयार आहे. त्यांनी सलमानला या चित्रपटाची पटकथा या पूर्वी सांगितली असून सलमानने चित्रपटासाठी होकार दिला होता, अशी चर्चा सुरु आहे.
ही पहिले वेळ आहे जेव्हा सलमान पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे नाव ब्लॅक टायगर नसेल. निर्माते चित्रपटासाठी वेगळ्या नावाचा विचार करतं असल्याच्या चर्चा आहेत.
सलमान लवकरच ‘टाइगर ३’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यानंतर सलमान साजिद नाडियाडवाला यांच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटात दिसणार आहे. तर सलमानचा ‘अंतिम’ हा चित्रपट देखील येणार आहे.