महाराष्ट्रकोंकण

उदय सामंत प्रतिष्ठान आयोजित मंगळागौर स्पर्धा २०२५

रत्नागिरी : उदय सामंत प्रतिष्ठान आयोजित मंगळागौर स्पर्धा २०२५ या उत्साही आणि पारंपरिक कार्यक्रमाला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली.

जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून पंधरा हजारांहून अधिक महिला भगिनींनी या उपक्रमात सहभाग घेतला, हे रत्नागिरीसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात मंगळागौर साजरी करणारा पहिलाच उपक्रम ठरला आहे – आणि त्यामागे आहेत आपल्या भगिनींची ऊर्जा, एकजूट आणि संस्कृतीप्रेम असल्याचे उदय सामंत ह्यांनी म्हटले.

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” या कार्यक्रमात मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी जाहीरपणे सांगितलं ही योजना कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता अखंड सुरू राहील! ही योजना महिला केंद्रित असून, तिच्यामागे एकनाथ शिंदे साहेबांची भक्कम भूमिका आणि आमचा ठाम निर्णय आहे. त्यामुळे ही योजना केव्हाही बंद होणार नसल्याचा विश्वास उदय सामंत ह्यांनी दिला.

तीर्थयात्रेचा संकल्प मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही महिला भगिनींसाठी ३ दिवसांची अष्टविनायक तीर्थयात्रा आयोजित करण्यात येणार आहे. भगिनींनी विनायकाकडे प्रार्थना करावी महाराष्ट्रावर कोणतंही संकट येऊ नये आणि आपल्या भावावरही अडचण येऊ नये – हीच विनंती करत चला, अष्टविनायकाच्या दर्शनासाठी सज्ज होऊया, असे आवाहन उदय सामंत ह्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!