महाराष्ट्रमुंबई

शिवसेना कोळी बांधवांच्या पाठीशी ठाम ! ससून डॉकमधील व्यावसायिकांना उद्धव ठाकरेंचे आश्वासन

मुंबई: शिवसेना कोळी बांधवांच्या पाठीशी ठाम आहे. त्यामुळे ससून डॉकमध्ये वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या भूमिपुत्र कोळी बांधवांना येथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना हा अन्याय तोडून मोडून टाकेल, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवालय येथे कोळी बांधवांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. यावेळी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत आणि आमदार सचिन अहिर आदी उपस्थित होते. ससून डॉकमधील मासळी उद्योग संकटात सापडला आहे. डॉकमधील गोडाऊनमध्ये पिढयान्पिढया व्यवसाय करणारे मासळी व्यावसायिक अनेक वर्षे महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळाला (एमएफडीसी) भाडे देत आहेत, मात्र ते भाडे आपल्याला मिळालेच नाही, असा दावा करून मुंबई पोर्ट प्राधिकरणाने मासळी व्यावसायिकांना बाहेर काढण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. त्याबाबत आज ससून डॉकमधील कोळी बांधवांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कोळी बांधवांच्या पाठीशी ठाम असल्याचे आश्वासन दिले.

आता शिवसेना तुमच्या सोबत आली आहे. तुमच्यासाठी आम्ही मैदानात उतरलोय. काही दिवसांनी बघू तर ज्यांच्यासाठी उतरलीय तेच गायब. असं होऊ देऊ नका. एकत्र रहा. एकजुटीने रहा. शिवसेनाप्रमुख बोललेले की अन्यायावरती तुटून पडा, पण मी म्हणेन की अन्याय करणान्याला अन्यायासकट तोडून टाका!

सरकारची एक चाल असते की एक पिल्लू सोडतात. अंगावर आलं की झटकून टाकायचं आणि जर त्यांनी ठरवलं की करायचंच आहे तर एक तात्पुरती वेळ घेतात, मग आंदोलनाला उतरणान्यांना शांत करतात, मग पोखरत बसतात. सरकार महाराष्ट्रातून मराठीला संपवायला निघालेत, असही ते म्हणाले.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!