महात्मा फुले अध्यासनासाठी शासनातर्फे ३ कोटी रू;मंत्री उदय सामंत यांची घोषणा

पुणे:- महात्मा फुले अध्यासनासाठी राज्य शासन ३ कोटी देणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.आज पुण्यामधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी बोलताना त्यांनी शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला.तसंच महत्त्वाच्या घोषणा देखील केल्या.
यावेळी बोलताना श्री. सामंत म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांचा पुतळा विद्यापीठ परिसरात उभारण्यासाठी शासनस्तरावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. समाजहिताच्या कोणत्याही कामासाठी शासनाकडून पुढाकार घेण्यात येतो. राज्यस्तरावर विविध महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठात अध्यासने सुरू करण्यात आली आहेत.
पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनासाठी ३ कोटी रुपये देण्यात येतील. विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र दर्शवणारी शिल्पे, लाईव्ह शो आदी बाबींच्या निर्मितीसाठी २ कोटी रुपये देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.