‘ हिरोगिरी ’ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करा

मुंबई: रमेश औताडे संविधानाने दिलेल्या लोकशाहीच्या माध्यमातून एका परिवाराने न्याय मिळावा म्हणून तब्बल एक महिना उपोषण केले. मात्र, प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने त्या उपोषणकर्त्याने पंकजा मुंडे यांच्या लक्षात आणून देण्यासाठी त्यांच्या ताफ्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्याला लाथ मारून ” हिरोगिरी ” करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करा अशी मागणी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा ने केली आहे.
हिरोगिरी करणारा पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी सिनेस्टाईल हिरोगिरी दाखवत एका निरपराध व्यक्तीच्या कमरेवर लाथ मारून मर्दानगी दाखवली, या प्रकाराने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या हिरो गिरी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला तातडीने बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा आंदोलन छेडणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा अध्यक्ष प्रकाश खरात यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.