पश्चिम विदर्भ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेचा बालेकिल्ला बनणार – मंत्री उदय सामंत

मुंबई : आज विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी बैठका शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत पार पडल्या.
या बैठकीत उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत पक्षविस्तार, विकासकामे आणि जनतेच्या प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. विदर्भातील शिवसेना अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला. तसेच पश्चिम विदर्भ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेचा बालेकिल्ला बनणार, असा विश्वास देखील उदय सामंत ह्यांनी यावेळी व्यक्त केला.
या बैठकांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री संजय राठोड, मा. खासदार राहुल शेवाळे, गोपीकिसन बाजोरिया, जगदीश गुप्ता, माजी आमदार धाने पाटील, माजी आमदार अभिजीत अडसूळ, शिवसेना सचिव संजय मोरे आणि भाऊ चौधरी यांसह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.