महाराष्ट्र
मुंबई – गोवा महामार्गावर रायगड जिल्हयातील रोहा येथे बर्निंग ट्रकचा थरार…

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्हयातील रोहा येथे रविवारी रात्री बर्निंग टकचा थरार पहावयास मिळाला. धान्याची वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकने अचानक पेट घेतल्याने एकच धावपळ उडाली.
या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ थबकली. सुदैवाने चालक व क्लिनर गाडीत नव्हते. अग्निशमक दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. या घटनेत ट्रकमधील धान्य जळून खाक झाले. आगीचे कारण समजू शकले नाही.





