महिलांच्या धाडसाला सलाम ” बाई तुझ्यापायी “….

मुंबई: स्त्रियांच्या धाडस, जिद्द आणि समाजाविरुद्धच्या लढ्याला सलाम करण्यासाठी झी ५ मराठीतर्फे ” बाई तुझ्यापायी ” या नव्या मालिकेच्या निमित्ताने मुंबईत खास वॉल म्युरल साकारण्यात आले आहे. शिक्षण, लिंगभेद आणि स्त्रियांच्या स्वप्नांसाठीच्या संघर्षाची भावना यात जिवंत करण्यात आली आहे.
निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित या सीरीजमध्ये साजिरी जोशी, क्षिती जोग आणि सिद्धेश धुरी यांच्या प्रमुख भूमिका असून कथा १९९० च्या दशकातील ग्रामीण महाराष्ट्रातील एका लहान मुलगी ‘अहिल्या’ हिच्या शिक्षणासाठीच्या लढ्याभोवती फिरते. समाजाच्या बंधनांनाही न जुमानता डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अहिल्याची कहाणी प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
अभिनेत्री क्षिती जोग म्हणाल्या, “‘बाई तुझ्यापायी’ ही केवळ अहिल्याची नाही, तर स्वतःची वाट शोधणाऱ्या प्रत्येक स्त्रीची कथा आहे. हे म्युरल त्या जिद्दीचं प्रतीक आहे.” साजिरी जोशी म्हणाल्या, “या म्युरलद्वारे स्त्रियांचा आवाज पडद्याबाहेर येऊन समाजात श्वास घेत आहे. हे चित्र लोकांना बदलाची प्रेरणा देईल.”






