घाटकोपर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण दयनीय अवस्थेत….

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (के पूर्व विभाग) यांच्या निष्काळजीपणामुळे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण व गार्डनची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. अनेक वर्षांपासून या सुसज्ज गार्डनकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक व युवती यांच्यात नाराजीचे वातावरण आहे.
जर तात्काळ गार्डनचा पुनर्विकास व देखभाल करण्यात आली नाही, तर स्थानिक स्तरावर आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मुंबई युवक अध्यक्ष सचिन लोंढे यांनी दिला आहे.
दररोज मोठ्या संख्येने नागरिक फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी या गार्डनमध्ये येतात; परंतु अंधारामुळे व देखरेखीअभावी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रात्रीच्या वेळी लाईट बंद असतात, ज्यामुळे महिला व युवतींना असुरक्षित वाटते. त्याचबरोबर काही असामाजिक तत्वांकडून मद्यपान व गांजाचे सेवन खुलेआम केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.






