महाराष्ट्र
वोट चोरी विरोधात मुंबई युवक काँग्रेसचे जनजागृती अभियान…

मुंबई: युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन आणि पदाधिकाऱ्यांनी आज घाटकोपर ते साकीनाका मेट्रो व अंधेरी ते गोरेगाव लोकल रेल्वे मार्गावर मेट्रो आणि लोकलमधून प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी निवडणूक आयोग व भाजपाच्या वोट चोरीची पर्दाफाश केला आहे. याबाबतची माहितीपत्रके वाटून लोकांमध्ये जगजागृती करत त्यांना वोटचोरीचू माहिती दिली.
लोकशाहीच्या रक्षणासाठी जागरूक नागरिकांनी या वोटचोरीविरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.





