मोठी बातमी! जम्मूतील वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी,२ महिलांसह १२ भाविकांचा मृत्यू तर वीसहून अधिकजण जखमी

जम्मू- जगभरात नवीन वर्षाचे स्वागत धुमधडाक्यात होत असताना जम्मू कश्मीरमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. जम्मू येथील वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली असून या चेंगरा-चेंगरीमध्ये दोन महिलांसह बारा भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर २० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या स्थानिक प्रशासनाकडून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी बचावकार्य देखील सुरू करण्यात आले आहे. संबंधित घटनेची माहिती पंतप्रधान कार्यालयाला कळतात पंतप्रधानांनी या घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे. तसंच मृतांच्या नागरिकांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून ५० हजार रुपयांची मदत देऊ केली आहे.
जम्मूचे उपराज्यपाल मनोज सिंह यांनी मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं सांगितलं आहे. सध्या भारतीय सेनेचे जवान आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असून भाविकांना योग्य ठिकाणी हलविण्यासाठी हालचाली करत आहेत. दरम्यान ही चेंगराचेंगरीची घटना कशी घडली याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही.