गोरेगाव मुलुंड लिंक रोडच्या कामाची आमदार सुनील प्रभूंनी केली महापालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी..

मुंबई: शिवसेना नेते आमदार विभाप्रमुख माजी महापौर सुनील प्रभू यांनी सोमवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी गुडगाव मुलुंड लिंक रोडच्या जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग येथील रत्नागिरी हॉटेल ते फिल्म सिटी गेट पर्यंत जाणाऱ्या उड्डाण पूल आणि रस्त्यासंबंधी तेथे राहणाऱ्या नागरिकांना होत असलेल्या अडचणी बाबत महानगरपालिकेच्या रस्ते विभाग, पूल विभाग आणि परिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून काही समस्यांवरती तोडगा काढण्यासंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत रस्त्याच्या पलीकडे मोठ्या प्रमाणात असलेल्या वसाहतीतील नागरिकांना मुख्यत्वे नागरी निवारा , दिंडोशी महानगरपालिका वसाहत, जयभीम नगर श्रीकृष्ण नगर, येथे राहणाऱ्या नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या. यामध्ये पप्रामुख्याने श्रमसाफल्य सोसायटी जवळ श्रीकृष्ण नगर मधील नागरिकांना संतोष नगर बस स्टॉप वरती जाण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात यावा, रस्त्याच्या मध्यभागी असलेली पर्जन्य जल वाहिनी एका बाजूला घेऊन ते नव्याने तयार करण्यात यावी, गणेश मंदिर इंदिरा विकास केंद्र येथे श्रीकृष्ण नगर येथून येणाऱ्या नागरिकांना व गाड्यांना गोरेगाव कडे जाण्यासाठी त्रास होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी व बीएसटी बस फिरण्यासाठी टर्मिनल तयार करण्यात यावे अशा सूचना आमदार सुनील प्रभू यांनी यावेळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना केले आहे.
गोरेगाव मुलुंड लिंक रोडच्या बोगद्याच्या कामामुळे दादासाहेब फाळके चित्रनगरीतील हबाले आदिवासी पाड्यातील रस्ता पाड्यातील आदिवासी बाधांवना ये जा करण्यासाठी बंद झाला होता. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. या मिसिंग लिंक रस्त्याचे काम आता मुंबई महानगर पालिकेकडून सुरू करण्यात आले असून याचा शुभारंभ आमदार सुनिल प्रभु यांच्या हस्ते झाला.
त्याच प्रमाणे दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या प्रवेशव्दारा जवळ उड्डाणपूल उतरणार असून येथे वाहनांची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि भविष्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत नियोजन बैठक आयोजित करण्याच्या महापालिका परिरक्षण विभाग पूल विभाग व रस्ते विभागाला देखील सूचना देण्यात आल्या.
त्यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर सुहास वाडकर, माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे शाखाप्रमुख संपत मोरे व सर्व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.





