जितेंद्र आव्हाड (उपाध्यक्ष) आणि उन्मेष खानविलकर (सचिव) यांची MCA च्या निवडणुकीत निवड!
मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची निवड करण्यात आली आहे. आव्हाड यांनी नवीन शेट्टी यांचा 48 मतांनी पराभव केला. सचिव पदावर उन्मेष खानविलकर यांनी विजय मिळवला असून त्यांनी शाह आलम शेख यांचा पराभव केला. संयुक्त सचिव म्हणून निलेश भोसले यांची निवड झाली असून त्यांनी गौरव पय्याडे यांचा पराभव केला. एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत एकूण 362 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचा निकाल:
-
उपाध्यक्ष: जितेंद्र आव्हाड – 203 (विजयी) विरुद्ध नवीन शेट्टी – 155
-
सचिव: उन्मेष खानविलकर – 227 (विजयी) विरुद्ध शाह आलम शेख – 129
-
संयुक्त सचिव: निलेश भोसले – 228 (विजयी) विरुद्ध गौरव पय्याडे – 128
-
खजिनदार: अरमान मलिक – 237 (विजयी) विरुद्ध सुरेंद्र शेवाळे – 119
मुंबई टी20 गव्हर्निंग कौन्सिल सदस्य:
-
भरत किणी – 184 (विजयी) विरुद्ध किशोर जैन
ॲपेक्स कौन्सिल (नऊ विजयी उमेदवार आणि त्यांची मतसंख्या):
-
कदम विघ्नेश – 242
-
नदीम मेमन – 198
-
मिलिंद नार्वेकर – 242
-
भूषण पाटील – 208
-
विकास रेपाळे – 185
-
सूरज समत – 246
-
सावंत नील – 178
-
संदीप विचारे – 247
-
प्रमोद यादव – 186






