विद्यार्थ्यांना एसटीत अडचण आल्यास तातडीने संपर्क साधा! 1800 221 251 हेल्पलाईन कार्यान्वित शालेय बस उशिरा आल्यास अधिकाऱ्यांवर थेट कारवाई; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कडक आदेश

मुंबई; शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटी महामंडळाच्या प्रवासात कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास, बस वेळेवर न आल्यास किंवा अचानक रद्द झाल्यास तातडीने मदत मिळावी याकरिता एसटी महामंड
शैक्षणिक नुकसान झाल्यास थेट कारवाईळाने टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांक 1800 221 251 सुरू केला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.
मंत्री सरनाईक यांनी धाराशिव येथील मध्यवर्ती बसस्थानकास भेट दिली असता, विद्यार्थ्यांकडून त्यांना बसेस वेळेवर न सुटणे, अचानक रद्द होणे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले.
याची गंभीर दखल घेत, मंत्री महोदयांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास संबंधित क्षेत्रातील आगार व्यवस्थापक व त्यांचे पर्यवेक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल.
निलंबनाचा इशारा
* संबंधित विद्यार्थी, विद्यार्थिनी अथवा शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांनी/प्राचार्यांनी लेखी तक्रार केल्यास, जितक्या दिवसाचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, तितके दिवस यास जबाबदार असणाऱ्या पर्यवेक्षक अथवा अधिकाऱ्याला निलंबित (Suspend) अथवा सक्तीच्या रजेवर (Forced Leave) पाठवण्यात यावे.
* याबाबतचे निर्देश एसटीच्या महाव्यवस्थापक (वाहतूक) यांना देण्यात आले आहेत.
वाहतूक नियोजन आणि पर्यवेक्षण
सोमवार ते शुक्रवार, सायंकाळी ५ ते ६ या वेळेत मुख्य बसस्थानके तसेच विद्यार्थ्यांची चढ-उतार जास्त असलेल्या थांब्यांवर संबंधित आगाराच्या पर्यवेक्षकांनी गणवेशात थांबून वाहतुकीचे नियोजन करावे. शाळेचा शेवटचा विद्यार्थी सुखरूप बसमधून घरी जाईपर्यंत संबंधित पर्यवेक्षकांनी तेथून हलू नये, अशा स्पष्ट सूचनाही श्री. सरनाईक यांनी दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांसाठी सवलती
* राज्य शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना घरातून शाळेत ये-जा करण्यासाठी मासिक पासमध्ये 66.66% सवलत दिली जाते.
* तसेच, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत मासिक पास उपलब्ध आहे.
या हेल्पलाईन क्रमांकासोबतच, शाळा-महाविद्यालयांना ३१ विभागातील सर्व विभाग नियंत्रकांचे दूरध्वनी संपर्क क्रमांक देखील देण्यात येत आहेत, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत थेट मदत मिळवता येईल.




