राज्य हिवाळी अधिवेशनात झोपडीधारकांचा प्रश्न मार्गी लावा…

मुंबई: माणसाच्या मुलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा आहे. प्रत्येकाला योग्य निवारा असावा असे जागतिक निवारा संघटनेने निर्देश दिले आहेत. मात्र आजही फुटपाथ व झोपडपट्टीत राहणारे नागरिक पुनर्वसन होत नसल्याने अनेकजण उघड्यावर राहत आहेत. त्यांच्यासाठी राज्य हिवाळी अधिवेशनात झोपडीधारकांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन लोंढे यांनी केली आहे.
यासाठी आमदार अनंत बाळा नर यांची भेट घेऊन मुंबई पश्चिम रेल्वे लगत वास्तव्यात असलेल्या व मुंबईमधील फुटपाथवर वास्तव्यात असलेल्या नागरिकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करून नागरिकांना न्याय देण्याचे काम व त्यांना आधार देण्याचे काम करण्यात यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन लोंढे यांनी केली आहे.
झोपडीधारकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे याच्यासाठी शरद लोंढे यांनी अनेक आंदोलने केली मोर्चे काढले. काही दिवस लोंढे यांना जेलमध्ये जावे लागले. जोपर्यंत रेल्वे लगत व फूटपाथ वर वास्तव्यात असलेल्या नागरिकांना हक्काचे घर मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले.





