महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ? उदय सामंत यांचा खळबळजनक दावा..!

मुंबई:महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काही दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्योगमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
नागपूर येथे सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप आणि जोरदार दावे-प्रतिदावे सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर, उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांविषयी मोठा दावा केला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांचा नेमका दावा काय?
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी असा दावा केला आहे की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. इतकेच नाही, तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या संपर्कात देखील काही आमदार असल्याचे सूचित केले आहे. “काही दिवसांतच सगळं काही समोर येईल,” असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.
जर उदय सामंत यांचा हा दावा खरा ठरला, तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.





