महाराष्ट्र
महाडच्या चवदार तळ्यासाठी केंद्राने तीनशे कोटी रुपये द्यावेत ! खा. सुनिल तटकरे यांची लोकसभेत मागणी..

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्यावर ऐतिहासिक असा पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला होता. या ऐतिहासिक घटनेला २०२७ मध्ये शंभर वर्ष पूर्ण होत आहेत.
सत्याग्रहाचे हे शताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी केंद्र सरकारने तिनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा, त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शताब्दी महोत्सवाला उपस्थित रहावे, अशी महत्वपूर्ण मागणी रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी आज लोकसभेत बोलताना
केली.






