नागपूर घटनेवर प्रवीण दरेकरांचा तीव्र शब्दात निषेध, “दंगल करणाऱ्यांना सोडणार नाही”

मुंबई प्रतिनिधी : नागपूरमध्ये घडलेल्या घटनेवर विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. “ही घटना पूर्वनियोजित कट वाटतोय, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रवृत्ती दंगल घडवत असतील आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवत असतील, तर त्यांना अजिबात सोडणार नाही, कठोर कारवाई होईल,” असा इशारा दरेकरांनी दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केल्याचे दरेकर यांनी सांगितले. “मुख्यमंत्री आणि गडकरी यांनी संयम ठेवण्याचे सांगितले आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या मुद्द्यावर विधान परिषदेच्या सभागृहातही आपले मत मांडणार असल्याचे दरेकरांनी सांगितले. “नितेश राणे केवळ बोलले, त्यावरून वाद निर्माण करणे योग्य नाही. वड्याचं तेल वांग्यावर काढू नका,” अशा शब्दात त्यांनी टीकाकारांना सुनावले.
“कोणत्याही प्रकारे कबरीचं उदात्तीकरण होऊ नये. जर मुघल सम्राटाच्या छडा कापले जात असतील, तर ते योग्यच आहे. देशासाठी अत्याचार करणाऱ्या इतिहासातील व्यक्तींची भलावण होणे योग्य नाही,” असे मतही दरेकरांनी व्यक्त केले.