देशविदेश

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतले, फ्लोरिडामध्ये यशस्वी लँडिंग

( वृत्त संस्था) अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर तब्बल 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतले आहेत. त्यांचे फ्लोरिडाच्या समुद्र किनान्यावर यशस्वी लँडिंग झाले. हे दोघेही इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाच्या सहाय्याने पृथ्वी वर परतल्या आहेत.

सुनीता विलियम्स आणि बॅरी विल्मोर यांना घेऊन पृथ्वीवर परतलेले ड्रॅगन कॅप्सूल रिकव्हरी जहाजावर लोड करण्यात आले आहे. यानंतर आता एक-एक करून परतलेल्या सर्व चारही अंतराळ विरांना बाहेर काढले जाईल आणि त्यांची वैद्यकीय तपासणीही केली जाईलयासंदर्भात नासाने चारही अंतराळविरांचा पृथ्विवर परतल्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. यात स्पेस स्टेशनवरून परतलेले अंतराळवीर अभिनंदन करताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबत नासाने, ‘पृथ्वीवर परतल्यानंतर Crew9 ची पहिली झलक आपल्याला बघायला मिळत आहे!

आता रिकव्हरी पथके ड्रॅगनमधून बाहेर येण्यासाठी क्रूला मदत करतील, ही दीर्घकाळाच्या मोहिमेवरून परतल्यानंतर सर्व क्रू सदस्यांसाठी असलेली एक मानक प्रक्रिया आहे,” असे लिहिले आहे. खरे तर, सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर हे गेल्या 5 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अथवा स्टेशनवर (आयएसएस) वर पोहोचले होते. त्यांचा हा प्रवास केवळ 8 दिवसांचाच होता. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना 9 महिने तेथे थांबावे लागले. यानंतर आता ते पुन्हा पृथ्वीवर परतले आहेत. आपल्या मिशनच्या या दीर्घकाळात त्यांनी विविध प्रकारची कामे केली. या दोघांनी साधारणपणे फुटबॉल मैदानाच्या आकाराच्या या अंतराळ स्थानकाची देखभाल आणि स्वच्छता केली. याशिवाय, त्यांनी येथील जुनी उपकरणे बदलली आणि काही वैज्ञानिक प्रयोगही केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!