उदय सामंत यांना’लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२५’ पुरस्कार प्रदान!

मुंबई : राज भवन, मलबार हिल येथे पार पडलेल्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२५ पुरस्कार सोहळ्यात जनतेच्या विश्वासामुळे आणि लोकमतच्या ऑनलाइन मतदानाद्वारे मिळालेल्या पाठिंब्यामुळे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत ह्यांना देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातील जनतेने सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून देत दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मतदारांचे मनःपूर्वक आभार मानतो. तसेच, लोकमतच्या वतीने झालेल्या ऑनलाइन व्होटिंगमध्ये माझ्या बाजूने कौल दिल्याबद्दल सर्व चाहत्यांचे आणि जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो.
हा पुरस्कार जनतेच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा सन्मान आहे. तुमच्या साथीने जनसेवेची ही वाटचाल असाच पुढे चालू राहील, असे पुरस्कार स्वीकारताना उदय सामंत ह्यांनी म्हटले.