अपोलो हॉस्पिटल्सने दोन हृदयरुग्णांचे प्राण वाचवले
मुंबई / रमेश औताडे : अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथील डॉक्टरांनी २४ वर्षीय पूजा आणि ५५ वर्षीय संजीव सेठ यांचे जीव वाचवत पुन्हा एकदा आपल्या प्रगत हृदयरोग उपचार क्षमतेचे दर्शन घडवले.
पूजाला पल्मनरी एम्बोलिजम (फुफ्फुसाच्या धमन्यांमध्ये गुठळी) झाला होता, तर संजीव यांना मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजेच हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. दोघांचीही प्रकृती गंभीर होती.
डॉ. ब्रजेश कुंवर आणि त्यांच्या मल्टी-डिसिप्लिनरी टीमने त्वरित उपचार करत दोघांनाही नवजीवन दिले. पूजाला तीन दिवसांतच घरी सोडण्यात आले, तर संजीव सेठ यांच्यावर इम्पेला (कृत्रिम हृदय) प्रणाली वापरून उपचार करण्यात आले.
पूजा म्हणाल्या, “छातीत वेदना आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. अपोलो रुग्णालयात दाखल होताच उपचार सुरू झाले आणि माझा जीव वाचला.” या यशस्वी उपचारांनी अपोलो हॉस्पिटल्सची विश्वासार्हता पुन्हा सिद्ध झाली आहे.