मुंबईमहाराष्ट्र
सफाई कामगारांच्या घराच्या प्रश्नाला प्रविण दरेकरांनी पुन्हा एकदा अधिवेशनात वाचा फोडली

मुंबई – आज विधानपरिषदेत आमदार सचिन अहिर यांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी गटनेते प्रविण दरेकर यांनी सफाई कर्मचाऱ्यांचा प्रश्न सरकारसमोर मांडला. मुंबईच्या विकासात मोठे योगदान असलेल्या सफाई कामगार अनेक संकटांना सामोरे जात आहेत. सफाई कामगारांच्या घरांबाबत सातत्याने मागणी होत आहे, त्याचा आराखडाही तयार आहे. या आराखड्याची गतीने अंमलबजावणी शासनाने करावी. मंत्री महोदयांनी बैठकीचे आश्वासन दिले आहे. त्या बैठकीत सफाई कामगारांच्या घरांच्या प्रश्नाचाही अंतर्भाव करावा, अशी मागणी शासनाकडे केली. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दरेकरांनी मांडलेल्या सूचना बैठकीत अंतर्भुत करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले जातील, असे सकारात्मक उत्तर दिले.