रूग्णालयात आहार पुरवठा करणाऱ्या विरोधात उपोषण करणार
मुंबई / रमेश औताडे : सरकारी रुग्णालयांत आहार पुरवठ्याचे कंत्राट कैलाश फूड कंपनीने मिळवले आहे. मात्र हे कंत्राट ज्या कागदपत्रांच्या आधारे मिळवले आहे त्या कागदपत्रांची सखोल चौकशी करावी अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत जय जवान जय किसान संस्थेने सोमवारी केली.
या प्रकरणी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनाही निवेदन दिले आहे. सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही तर उपोषण करणार असल्याचा इशारा संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी दिला आहे. या प्रकरणी न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर १० फेब्रुवारी २०१५ रोजी मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात कैलाश फूडचे संचालक दिलीप म्हेत्रे यांच्यावर या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
जय जवान जय किसान संस्थेने मागणी केली आहे की, कंपनीला तात्काळ काळ्या यादीत टाकावे आणि सर्व आहार पुरवठा संस्थांचे ऑडिट करावे व पारदर्शक पद्धतीने कंत्राट द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.